पनवेल ः रामप्रहर वृत्त
दिव्यांगांच्या हक्कासाठी काम करणार्या दिव्यांग क्रांती संघटनेने पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या उमेदवारांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र संघटनेकडून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
पनवेल महापालिका निवडणुकीकरिता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले गट) महायुतीच्या उमेदवारांना दिव्यांग क्रांती संघटना जाहीर पाठिंबा देत असून संघटनेचे सभासद हितचिंतक व सर्व पदाधिकारी या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी कार्य करतील, असा विश्वास दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.पाटील, महाराष्ट्र सचिव राजाराम गोरे, पनवेल व उरण तालुकाध्यक्ष संदीप काशिद यांनी दिलेल्या पाठिंबापत्रात व्यक्त केला आहे.
Check Also
परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
पनवेलसह रायगडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (एमबीए) ८४वी चतुर्वार्षिक …
RamPrahar – The Panvel Daily Paper