Breaking News

विकासकामांच्या जोरावर महायुती पनवेल मनपा निवडणूक जिंकणार

भाजप नेते अरुणशेठ भगत यांचा विश्वास; प्रभाग 1मध्ये प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल परिसराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे पूर्ण झाली. ही कामे जनतेपर्यंत पोहचवणे कार्यकर्त्यांची मुख्य जबाबदारी आहे. विकासकामांच्या जोरावर आपण जनतेपुढे जात असून महापालिका निवडणूक जिंकू, असा विश्वास भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी प्रभाग क्रमांक 1मध्ये व्यक्त केला.
पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय महायुतीचे प्रभाग क्रमांक 1मधील उमेदवार विजयश्री संतोष पाटील, लीना नंदकुमार म्हात्रे, नितेश बाळकृष्ण पाटील आणि संतोष बाबुराव भोईर यांच्या प्रचाराचा शुभारंभ भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 3) धानसर येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
यानिमित्ताने आयोजित प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीत कार्यकर्त्यांचा ताफा सहभागी झाला होता. ठिकठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
भाजप नेते अरुणशेठ भगत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत भाजप महायुतीचे सहा उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. ही तर फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी आहे. पुढे त्यांनी आपला विजय निश्चित असला तरी गाफील न राहता पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने कामाला लागा आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहचून प्रचार करा, असे सूचित केले.
भाजपचे तालुका उपाध्यक्ष सुरेश पोरजी, प्रभाग 1 सरचिटणीस जितेंद्र पोरजी, राजेश तांबोळी, काळुराम गोंधळी, विष्णू पोरजी, अभिमन्यू पोरजी, राजेश पोरजी, अक्रम शेख, ज्ञानेश्वर पोरजी, रवी पोरजी, अमीर पोरजी, विश्वनाथ पोरजी, सुरज गोंधळी, अमित पोरजी, रामू पोरजी, सलमान शेख, अरमान शेख, संजय गोंधळी, विजय गोंधळी, बाबुराव पोरजी, अनंता पोरजी, बंडू गोंधळी, रूपेश गोंधळी, अर्जुन गोंधळी, चंदा पोरजी, नंदा पोरजी, कीर्ती पोरजी, अश्विनी पोरजी, शारदा पोरजी, गौरी पोरजी, निकिता पोरजी, पद्मा पोरजी, राशिदा सुलतान शेख, जीवन पोरजी, पूनम गोंधळी, जागृती गोंधळी, कल्पेश गोंधळी, मोनिका पोरजी, स्वाती पोरजी, केतन गोंधळी, अक्षय पाटील, किरण पाटील, बारक्या पाटील, प्रियांका पोरजी, दिव्या पाटील, मनिषा पाटील, जोत्स्ना भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply