Breaking News

पनवेल महापालिका निवडणुकीत शेकाप, शिवसेनेला धक्का

काळुंद्रेतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला दिवसेंदिवस धक्के बसत असून विशेषतः शेतकरी कामगार पक्षाची अवस्था बिकट होत चालली आहे. याचाच प्रत्यय पुन्हा आला असून काळुंद्रे गावातील शेकाप व शिवसेनेच्याच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
काळुंद्रे येथील शेकापचे सक्रिय कार्यकर्ते व काळुंद्रे प्रकल्पग्रस्त संघटनेचे उपाध्यक्ष संतोष बळीराम म्हसकर, ज्येष्ठ कार्यकर्ते बाजीराव मधुकर घरत, अनिल धाऊ म्हात्रे, शिवसेना ठाकरे गटाचे अविनाश मधुकर म्हसकर तसेच काळुंद्रे सिडको महिला मंडळाच्या राजकुमारी हिरालाल मीना, पुष्पा पाटील, श्री महिला बचत गटाच्या स्वाती जाधव, विनिक्षा कासार, मोनाली शिंदे, ज्युली सिंग, अनिता सिंग, मणिमाला गणेशन, अकलोशी मीना, कलादेवी, पिंकी मीना यांनी त्यांच्या समर्थकांसह मंगळवारी (दि. 6) भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.
या कार्यक्रमास नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, सुनील बहिरा, प्रभाग 20चे अध्यक्ष रघुनाथ बहिरा, ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर म्हात्रे, काळुंद्रे गाव अध्यक्ष बाळाराम चिखलेकर, बूथ अध्यक्ष विशाल म्हसकर, नरेश घरत, सचिन चिखलेकर, ज्येष्ठ कार्यकर्त्या कल्पना पाटील, प्रभाग 20 युवा अध्यक्ष विकास म्हसकर, सतीश पाटील आदी उपस्थित होते.
काळुंद्रे गाव प्रभाग क्रमांक 20मध्ये येत असून या प्रभागातून अजय बहिरा व प्रियांका कांडपिळे हे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. उर्वरित एका जागेसाठी भाजप महायुतीच्या उमेदवार श्वेता बहिरा निवडणूक लढवत असून या पक्षप्रवेशाचा त्यांना निश्चितच लाभ होणार असल्याचे बोलले जात आहे.

Check Also

माथेरानमधील हातरिक्षा संघटनेच्या आणखी सात सदस्यांचा भाजपत प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी माथेरानमधील हातरिक्षाचालक संघटनेच्या आणखी सात …

Leave a Reply