Breaking News

पनवेल मनपा प्रभाग 2मध्ये महायुतीची रॅली

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाने कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा न करता पनवेल महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात विकासकामे करून दाखवली आहेत. ‘सबका साथ सबका विकास’ हा मंत्र घेऊन शहरी आणि ग्रामीण भागाचा समतोल विकास साधला असून विकासाचा हा वेग कायम राखण्यासाठी येत्या 15 तारखेला महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. 10) प्रभाग 2मध्ये भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती. नावडे कॉलनीपासून सुरू झालेली ही रॅली नावडे गाव, पेंधर, नागझरी, ढोंगर्‍याचापाडा, पाटीलवाडी, देवीचापाडा, पाले खुर्दमार्गे जात तोंडरे येथे गेली. या रॅलीच्या माध्यमातून महायुतीने शक्तिप्रदर्शन करत विजयाचा निर्धार व्यक्त केला.
या रॅलीत महायुतीच्या उमेदवार काजल महेश पाटील, अरुणा किरण दाभणे, दिनेश रवींद्र खानावकर आणि कृष्णा पाटील यांनी सहभागी होऊन मतदारांशी संवाद साधला. रॅलीमध्ये उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शैलेश मिश्रा, सचिव अ‍ॅड. इंदू दुबे, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, संतोष शर्मा, नारायणशेठ पाटील, वासुदेव पाटील, एकनाथ देशेकर, अशोक साळुंखे, काळुराम फडके, प्रकाश खैरे, बाळाराम पाटील, शुभ पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रॅलीच्या सांगता सभेत बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपच्या विकासकामांचा आढावा घेतला. देशाप्रती प्रेम असलेला माणूस कशा पद्धतीने काम करू शकतो, याचे जिवंत उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचे सांगत त्यांनी नेतृत्वाचे कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व घटकांसाठी योजना राबवून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply