कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील ममदापूर येथील रहेमान फाउंडेशन आणि कोकण युनायटेड फाउंडेशन यांच्या माध्यमातून चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी ममदापूर आणि नेरळ भागातून मदत गोळा करण्यात आली. मदतीचे 300 किट या फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी चिपळूण शहरातील कुंभारआळी आणि मुरारपूर भागात वाटप केले. नेरळजवळील ममदापूर येथील रहमान फाउंडेशन आणि कोकण मुस्लिम युनाइटेड फाउंडेशन त्यांच्या माध्यमातून चिपळूण मधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी नेरळ आणि ममदापूर येथील या दोन्ही फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मदत एकत्र केली. रहमान फाउंडेशन आणि कोकण मुस्लिम युनायटेड फाउंडेशन च्या माध्यमातून चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे 300 किट बनविण्यात आले. साधारण 15 किलो वजनाचे हे किट फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी नेरळ, ममदापूर येथून रत्नागिरी जिल्ह्यात जाऊन वाटप केले. 300 रेशन किटबरोबरच 5500 पाण्याच्या बाटल्या, कपडे, टॉवेल या वस्तूदेखील पूरग्रस्तांना वाटप केल्या. चिपळूण शहरातील कुंभार आळी, मुरादपूर या भागात हे किट वाटप करण्यात आले. नेरळ, ममदापूर येथील रहेमान फाउंडेशन आणि कोकण युनायटेड फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे.