Breaking News

एसआयआर अभियानाच्या पनवेल विधानसभा प्रमुखपदी परेश ठाकूर यांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहीच्या अधिकृत पत्राद्वारे महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानासाठी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशतर्फे १८८ – पनवेल विधानसभा क्षेत्राचा BLA-१ (विधानसभा प्रमुख) म्हणून पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणादायी बाब आहे. त्यांच्या नेतृत्वातून संघटन अधिक बळकट होऊन कार्याला नवी गती मिळेल, असा विश्वास आहे असे म्हणत आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगरसेवक परेश ठाकूर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले आहे.

Check Also

टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषची कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन अन्‌‍ शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या …

Leave a Reply