पनवेल : रामप्रहर वृत्त
दानशूर व्यक्तिमत्व, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रामपर्व हा भव्य सांस्कृतिक सोहळा श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेज गव्हाण-कोपर, माजी विद्यार्थी आणि सहकारी यांच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात झाला.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी गर्दी केली होती. संपूर्ण परिसर सांस्कृतिक वातावरणाने न्हाऊन निघाला होता. यावेळी माजी विद्यार्थी संघटना व श्री छत्रपती शिवाजी विद्यालय यांच्या वतीने ‘रामपर्व पुरस्कार २०२६’ मानपत्र देऊन लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सपत्नीक भव्य सन्मान करण्यात आला. या भव्य दिव्य सोहळ्यानिमित्त आयोजक, संयोजक, ग्रामस्थ, हितचिंतकांचे लोकनेते रामशेठ रामशेठ ठाकूर यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेज गव्हाण-कोपर येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते रामशेठ ठाकूर हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष व संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जे.एम. म्हात्रे, भाजपचे राज्य परिषद सदस्य व स्थानिक स्कुल कमिटी चेअरमन अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते व जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख,कॉगेसचे जिल्हाध्यक्ष व जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, भारताचे माजी कसोटीपटू निलेश कुलकर्णी, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.गणेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेविका प्रतिभा भोईर, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालक अर्चना ठाकूर, ज्येष्ठ सहकारी बी. टी. कांबळे, मजीद सोलकर, एम. डी. खारकर, गोपीनाथ कोळी, हरीभाऊ देशमुख, एकनाथ देशमुख, गुलाब नाईक, मोरेश्वर देशमुख, वसंतशेठ पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी विलासराव जगताप, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, जिल्हा परिषद सदस्या निकिता खारकर, पंचायत समिती सदस्या जिज्ञासा कोळी, वितेश म्हात्रे, अनंता ठाकूर, विजय घरत, उत्तम कोळी, ॲड.राहुल घरत, विश्वनाथ कोळी, संजीव पाटील, मनोज आंग्रे, सी.एल. ठाकूर, योगिता भगत, सुहास भगत, राम मोकल, हेमंत ठाकूर, जयवंत देशमुख, साईचरण म्हात्रे, किशोर कोळी, निलेश खारकर, वैभव घरत, कामिनी कोळी, सुधीर ठाकूर, धीरज ओवळेकर, विद्यालयाच्या प्राचार्या ज्योत्स्ना ठाकूर, लाईफ मेंबर रवींद्र भोईर, डी. बी. पाटील, संजीवनी म्हात्रे, कामोठे स्कुलच्या प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे, विलासराव लेंभे, शशिकला पाटील, सायली वडवलकर, प्रणिता गोळे, अपूर्व ठाकूर, आदित्य ठाकूर यांच्यासह आयोजक आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय विविध मान्यवर, पदाधिकारी आणि रयत शिक्षण संस्थेचे सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रामपर्व अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी सादर झालेल्या नृत्य, संगीत, नाट्य आणि कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमादरम्यान लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाची महती यावेळी विशद करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांसह आजी विद्यार्थी आणि गव्हाण विद्यालयाच्या शिक्षकांनी देखील नृत्याविष्कार सादर करून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंगाचे सादरीकरण केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनातील काही प्रसंगाच्या आठवणी सांगणाऱ्या त्यांच्या समकालीन व मित्रपरिवार आणि कुटुंबीय यांच्या प्रातिनिधिक मुलाखतींची ध्वनिचित्रफित यावेळी प्रदर्शित करण्यात आली.
यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वतः आपल्या परीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सहभाग नोंदवला. यावेळी नृत्याविष्कार, नाट्यविष्कार, भजन आदी विविध बहारदार आणि रसिकांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या कार्यक्रमांद्वारे कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यार्थी भाषण स्मित मोकल याने तर मानपत्र वाचन व सूत्रसंचालन सागर रंधवे व दर्शना माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक स्कूल कमिटीचे पदाधिकारी, सहकारी, माजी विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग यांनी परिश्रम घेतले. एकूणच रामपर्व हा सोहळा उत्साहात आणि संस्मरणीय वातावरणात पार पडला.
Check Also
भारतमाता चित्रपटगृहाशी माझं नातं अगदी वेगळं…
भारतमाता चित्रपटगृहाने छान कात टाकली. ते आजचं झाले.बदल हा होतच असतो, तो व्हायलाही हवा. काही …
RamPrahar – The Panvel Daily Paper