Breaking News

‌‘एसआयआर‌’च्या उरण विधानसभा प्रमुखपदी डॉ. अविनाश गाताडे

पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानासाठी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशतर्फे १९०- उरण विधानसभा क्षेत्राचा BLA-१ (विधानसभा प्रमुख) म्हणून डॉ. अविनाश गाताडे यांची नियुक्ती केल्याचे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे. ही नियुक्ती आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणादायी बाब आहे. त्यांच्या नेतृत्वातून संघटन अधिक बळकट होऊन कार्याला नवी गती मिळेल, असा विश्वास आहे असे म्हणत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी डॉ. अविनाश गाताडे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले आहे.

Check Also

परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

पनवेलसह रायगडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (एमबीए) ८४वी चतुर्वार्षिक …

Leave a Reply