पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या अनुषंगाने रायगड जिल्हा पुरुष व महिला संघातील प्रत्येक खेळाडूला श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने संपूर्ण स्पोर्ट किटचे प्रदान करण्यात आले.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने हे स्पोर्ट किट देण्यात आले. खेळाडूंना दर्जेदार क्रीडा साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या तयारीस चालना देण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.
यावेळी आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम, छत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत ठाकूर, संघ व्यवस्थापक प्रमोद म्हात्रे, क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. यामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी स्पर्धेसाठी त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, २ ते ६ एप्रिलदरम्यान सिन्नर (जि. नाशिक) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी रायगड जिल्हा पुरुष व महिला कबड्डी संघ १ एप्रिल रोजी रवाना होणार आहे.
Check Also
करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींचे भक्कम पाठबळ!
मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य ः आमदार महेश बालदी उरण : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper