खारघर ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या वतीने रविवारी (दि.19) आयोजित करण्यात आलेल्या खारघर हिल महापौर मॅरेथॉन प्रोमो रनला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या प्रोमो रनचे उद्घाटन भाजप प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि महापौर नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या धावण्याच्या स्पर्धेत पाच आणि 10 किलोमीटर गटात तब्बल तीन हजारहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. या यशस्वी आयोजनामुळे आगामी मुख्य खारघर हिल महापौर मॅरेथॉनसाठी एक भक्कम पायाभरणी झाली आहे.
आगामी मुख्य मॅरेथॉनमध्ये 5, 10, 21 आणि 42 किलोमीटर अशा विविध गटांचा समावेश असणार असून नागरिकांनी त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
फिट पनवेल, हेल्दी पनवेल या संकल्पनेला बळ देणाऱ्या या उपक्रमावेळी पनवेल महापालिकेच्या उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार, नगरसेवक प्रवीण पाटील, सुमित झुंजारराव, नरेश ठाकूर, दिनेश खानावकर, मनोज भुजबळ, काका शेळके, मधु पाटील, जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, रूपेश नागवेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. महापालिकेच्या या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
Check Also
न्हावाशेवा पाणीपुरवठा टप्पा-३ वेळेत पूर्ण करा
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रशासनाला निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेत शुक्रवारी (दि. १७) आमदार …
RamPrahar – The Panvel Daily Paper