खोपोली : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खोपोली शहर संघटक दिलीप पुरी यांचे पुत्र आमिष पुरी आणि त्यांच्यासोबत यश कळमकर यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजप प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले.
पनवेल येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेलचे महापौर नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, खोपोलीचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, ज्येष्ठ उद्योजक यशवंत साबळे, पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, कर्जत विधानसभा उपाध्यक्ष राजेश भगत, सदस्य संजय तन्ना, खोपोली मंडळ अध्यक्ष अजय इंगुळकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. येणाऱ्या काळात पक्षाची विचारधारा खोपोलीतील घरोघरी पोहचवून पक्ष संघटन अजून मजबूत करण्याची ग्वाही आमिष पुरी यांनी यावेळी दिली.v
Check Also
एजे क्रिकेट अकादमीकडे टीआयपीएल सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
पनवेल : रामप्रहर वृत्तएजे क्रिकेट अकादमीने ॲडव्हान्स क्रिकेट क्लबला नमवत सोसायटी क्रिकेट क्लब यांच्या वतीने …
RamPrahar – The Panvel Daily Paper