पनवेल : रामप्रहर वृत्त
नारीशक्ती विधेयकाबाबत घडलेल्या घडामोडींवर भाष्य करण्यासाठी पनवेल शहरातील भाजप मध्यवर्ती कार्यालयात महिला मोर्चाच्या वतीने सोमवारी (दि.२७) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. महिला सक्षमीकरणाला भाजपचे प्राधान्य असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
पत्रकार परिषदेला महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, उपमहापौर प्रमिला पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम, पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. १६ एप्रिल हा नारीशक्ती विधेयकाचा दिवस देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदला गेला असता, मात्र विरोधकांनी या विधेयकाला विरोध केल्यामुळे ते मंजूर होऊ शकले नाही, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेस पक्षाने नेहमीच महिला आरक्षणाला अडथळा निर्माण करण्याचे काम केले असून महिलांच्या सशक्तीकरणाबाबत त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper