खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात आणि दिमाखात पार पडले. या कार्यक्रमाचा मुख्य विषय ‘लोकनेता : एक युगपुरुष’ असा होता. विद्यार्थ्यांनी संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाला लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, महापौर नितीन पाटील, संचालक तथा नगरसेवक परेश ठाकूर, सदस्य राहुल घरत, सचिव डॉ. एस.टी. गडदे, नगरसेवक प्रवीण पाटील, प्रभाकर जोशी, नगरसेविका परेशा पटेल, अनिता पाटील, सोनाली नवघरे, उषा अडसूळ, प्रतिभा भोईर, दर्शना भोईर, माजी पं.स. सदस्य रत्नप्रभा घरत, शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते. नाटक, नृत्य आणि विविध कलाप्रकारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संघर्षमय प्रवासापासून ते यशशिखरापर्यंतचा प्रवास जिवंत केला.
कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण अपूर्व ठाकूर यांनी प्रभावीपणे केले, तर सूत्रसंचालन आदित्य ठाकूर यांनी समर्थपणे पार पाडले. यावेळी दहावी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक पटकावलेल्या अनन्या भुतडा हिला २५ हजार रुपये, तर इतर चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये देण्यात आले तसेच बारावी उत्तीर्ण होऊन आयआयटी, एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवलेल्या आणि राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
Check Also
पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा
मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …
RamPrahar – The Panvel Daily Paper