पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. या मोहिमेद्वारे मृत, स्थलांतरित, डुप्लिकेट तसेच बेकायदेशीररीत्या समाविष्ट झालेल्या मतदारांची नावे वगळण्यावर विशेष भर दिला जात आहे. राज्यात एप्रिलपासून या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.
या संदर्भात गुरुवारी (दि.३०) प्रांताधिकारी पवन चांडक यांच्या उपस्थितीत पनवेल येथे सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल विधानसभा क्षेत्र बीएलए-१ विधानसभा प्रमुख व नगरसेवक परेश ठाकूर, महापालिकेचे उपायुक्त नानासाहेब कामठे, भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक सुमित झुंजारराव, युवा नेते मयुरेश नेतकर, रूपेश नागवेकर यांच्यासह सर्वपक्षीय उपस्थित होते. उपस्थितांनी प्रशासनाशी चर्चा केली.
या बैठकीत अभियानादरम्यान येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना तसेच अधिकारी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्यात आवश्यक समन्वय कसा साधता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. अभियानाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी परस्पर सहकार्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
Check Also
नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्या; भाजपचे लक्षवेधी आंदोलन
पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper