Breaking News

नवी मुंबई विमानतळाला ‌‘दिबां‌’चे नाव द्या; भाजपचे लक्षवेधी आंदोलन

पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुधवारी (दि. २४) विमानतळ परिसरात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी ‌‘दिबां‌’च्या प्रतिमेला अभिवादन करून नामकरणाच्या मागणीचा पुनरूच्चार करण्यात आला.
यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव मिळावे ही संपूर्ण रायगड आणि नवी मुंबई परिसरातील जनतेची भावना आहे. नामकरणाचा निर्णय केंद्रीय पातळीवर लवकरात लवकर व्हावा.
या आंदोलनात आमदार महेश बालदी, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, ‌‘दिबां‌’चे पुत्र अतुल पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेलचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे यांच्यासह प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र, स्थानिक संघटनेचे प्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक-नगरसेविका, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान उपस्थितांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी जोरदारपणे मांडली. शासनाने जनभावनेचा सन्मान करून विमानतळाच्या नामकरणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Check Also

राज्यातील जलप्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांचा विधिमंडळात आवाज

मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जलप्रदूषणाच्या समस्येमुळे नद्या, तलाव, धरणे, खाड्या, भूजल तसेच किनारी भागांच्या पर्यावरणावर …

Leave a Reply