माणगावात कलशारोहण समारंभ

माणगाव : जुने माणगाव येथील श्री स्वयंभू संगमेश्वर देवस्थान मंदिराचा कलशारोहण समारंभ 30 व 31 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त गुरुवार (दि. 30) दुपारी कलश पूजन व मिरवणूक काढण्यात येणार आहे. भद्रकाली नृत्यमंडळ कला पथक (बंगलोर) हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण आहे. शुक्रवार (दि. 31) पहाटे रुद्राभीषेक, वास्तुशांती, होमहवन, पूर्ण आहूती त्यानंतर दुपारी प्रकाश स्वामी (जंगम) यांच्या मार्गदर्शनाखाली  व महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांच्या हस्ते कलशारोहन, महाआरती व महाप्रसाद असे कार्यक्रम होणार असल्याचे श्री स्वयंभू संगमेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष संजयअण्णा साबळे यांनी केले आहे.

जाहिद फकजी यांचा सत्कार

मुरुड : येथील सामाजिक कार्यकर्ते जाहिद फकजी यांना  जिल्हा परिषदेचा रायगड भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल युनिक फाउंडेशन तर्फे त्यांचा नुकताच वसिउद्दिन उमरी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. मुरुडमधील रणदिवे पाखाडी येथील इम्रान सुभेदार यांच्या निवास्थानी झालेल्या या सत्कार सोहळ्याला डॉ. मुश्ताक शीघ्रेकर, अमीर खांजादा, शबीर पालोजी, बशीर सुभेदार, इम्रान सुभेदार, रिजवान उलडे, नईम पांगारकर, जैद धाकम, इरफान उलडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोयना पुनर्वसाहत सेवा संघाची बैठक

नागोठणे :  अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाच्या राज्य कार्यकारणीच्या सदस्य आणि सल्लागारांची सभा रविवारी (दि. 2)  दुपारी 2 वाजता तांबी (वडवळ) येथील संघाचे उपाध्यक्ष जितेंद्र सकपाळ यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संघाचे ज्येष्ठ सल्लागार मारुती देवरे यांनी दिली.  बळीराम शिंदे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात येणार्‍या या सभेला कार्यकारणी सदस्य तसेच सल्लागार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply