लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले मार्गदर्शन; गुणवंत शिक्षकांचा सत्कार
पनवेल ः रामप्रहर वृत्त
आपले कामकाज वेळच्या वेळी करणे अत्यंत महत्त्वाचे असून शाळेचे कामकाज सुरळीत व गुणवत्तेने चालण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने सतत जागृत राहणे गरजेचे आहे. सध्या काम उत्तम सुरू आहे आणि ते अधिक चांगल्या आणि प्रभावी पद्धतीने व्हावे यासाठी सर्वांनी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठे येथे सहविचार सभेत केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील रायगड विभागीय कार्यालयात गुरुवारी (दि.३०) शाखाप्रमुखांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा सर्वंकष आढावा आणि भावी योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गुणवत्ता कक्ष अंतर्गत रायगड विभागातील शाळांना उत्कृष्ट मार्गदर्शन करणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विशेष सत्कार
करण्यात आला.
या सभेला रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे, सहाय्यक विभागीय अधिकारी विलास जगताप, लाईफ मेंबर प्रमोद कोळी, महेश पाटील यांच्यासह विविध शाळांचे प्रमुख, शिक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक एम.आर. पाटील, उपशिक्षक ए.पी. पाटील, एन.के. भगत, एस.एच. म्हात्रे, आर.व्ही. चिपळेकर, पी.पी. वाघोस्कर, एन.बी. म्हात्रे, मुख्याध्यापक देवेंद्र पाटील, तुषार म्हात्रे, विद्याधर पाटील, महेश पाटील, केवल पाटील, ज्योत्स्ना पाटील, सुहास नाईक, अविनाश घरत, निवृत्ती प्रबळकर, शैलेश ठाकूर, बालाजी डाढाळे या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
RamPrahar – The Panvel Daily Paper