पुणे ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांचा विकास आराखडा, शहराचे नियोजन, बांधकाम परवानग्या व लेआऊट मंजुरी तसेच विकसकांना येणाऱ्या अडचणी अशा विविध विषयांवर पनवेल महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.३०) नगररचना संचालनालयाचे संचालक जितेंद्र भोपळे यांची पुणे येथे भेट घेऊन सविस्तर व सकारात्मक चर्चा केली.
या बैठकीस पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, स्थायी समितीचे सभापती बबन मुकादम, माजी सभागृहनेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर उपस्थित होते.
पनवेलचा नियोजित, शाश्वत व सर्वसमावेशक विकास अधिक वेगाने करण्याच्या दृष्टीने विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी, शहरी नियोजन प्रक्रियेला गती, बांधकाम परवानग्यांमधील सुलभता, नागरिकाभिमुख विकासकामांना चालना देण्यासाठी आवश्यक अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper