Breaking News

समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव

विविध समाजोपयोगी उपक्रम; जनसेवेची परंपरा कायम

पनवेल : रामप्रहर वृत्त
समाजहिताची भूमिका समर्थपणे निभावणारे आणि कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय नेतृत्व, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस यंदाही सामाजिक बांधिलकी जपत बुधवारी (दि.५) मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष दिवशी आमदार प्रशांत ठाकूरयांनी वडील लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आई शकुंतला ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर पनवेलमधील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. राज्याचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री भरत गोगावले, भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, मुंबई अध्यक्ष अमित साटम, आमदार महेश बालदी, आमदार किसन कथोरे, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार महेंद्र थोरवे, सुप्रसिद्ध अभिनेते विजय गोखले यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, कला, क्रीडा, प्रशासकीय, विधी, पत्रकारिता, वैद्यकीय, संगीत, नाट्य, सामाजिक संस्था, संघटना, विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभीष्टचिंतन केले.
यावर्षीही वाढदिवसानिमित्त जनआरोग्य शिबिर, महारोजगार मेळावा, शैक्षणिक साहित्य वाटप, महिला सक्षमीकरण कार्यक्रम आदी समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमांद्वारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी जनतेप्रती असलेली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली.
महापौर नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने ऋतू हिरवा विशेष संगीतमय कार्यक्रम, के.एन. गुजर हॉस्पिटलच्या वतीने कराड येथे आरोग्य तपासणी, रक्तदान, नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि नादब्रह्म साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका शुभदा पराडकर यांचे मार्गदर्शन, जयेंद्रशेठ जोशी युवा मंच आणि रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठे येथे समाजोपयोगी वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम, नगरसेविका दर्शना भोईर यांच्या संयोजनाखाली व्हिजन फ्रेंडसाकीब गोरे यांच्या सहकार्याने ‌‘देवाभाऊ चष्मा‌’ या विशेष उपक्रमांतर्गत गरजू तिथे चष्मा आणि मोतीबिंदू निवारण जनआरोग्य शिबिर, नगरसेवक रवींद्र भगत यांच्या वतीने कळंबोलीत आरोग्य शिबिर, आभा व आयुष्यमान कार्ड, विद्यार्थ्यांचा सत्कार व वही वाटप तसेच विकासकामांचे उद्घाटन, नगरसेवक विजय खानावकर यांच्या वतीने कळंबोलीत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप, नागरिकांसाठी नेत्र तपासणी व चष्मे वाटप तसेच हायमास्ट दिव्यांचे उदघाटन, शिवसेना शहरप्रमुख तुकाराम सरक, नगरसेविका सायली सरक व शिवसेना कळंबोली शहराच्या वतीने वृक्षदिंडी, वृक्षारोपण आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या वतीने एनसीएमसी कार्ड शिबिर, आरपीआयचे पनवेल महापालिका जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या वतीने पॅनकार्ड व आधार कार्ड शिबिर, नगरसेवक गणेश कडू यांच्या वतीने पनवेल महापालिकेच्या व इतर शाळांना थोर समाजसुधारक यांच्या जीवनावरील दोन हजार पुस्तके वाटप कार्यक्रम, मेसर्स एस.पी. घरत कन्ट्रक्शन व काळुंद्रे भाजपच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, प्रभाग १९ भाजपच्या वतीने स्वच्छता मोहीम तसेच वृक्षारोपण, करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप असे विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले.
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासात्मक दृष्टिकोन, समाजाभिमुख उपक्रम आणि लोकसहभागाला दिलेले प्राधान्य सातत्याने महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मतदारसंघाचा चेहरामोहरा विकासात रूपांतर झाला. त्या अनुषंगाने पनवेल परिसरातील शहरी तसेच ग्रामीण विकासाला नवे परिमाण प्राप्त झाले आहे. सर्वसामान्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठीची त्यांची तळमळ तसेच प्रत्येक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ते करत असलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा ही जनतेप्रती असलेली त्यांची निष्ठा अधोरेखित करणारी बाब आहे.
विकासकामांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यासाठी सातत्याने कार्यरत राहणे, विविध विकासकामांचा नियमित आढावा घेणे आणि प्रशासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करणे यामुळे त्यांची ओळख एक कर्तव्यदक्ष, कार्यक्षम आणि जनतेशी सदैव जोडलेला लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. अत्यंत धावपळीची दिनचर्या असूनही मतदारसंघातील नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव उपलब्ध राहण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे. विकासाची दूरदृष्टी, जनसेवेची तळमळ आणि लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांचे कार्य प्रेरणादायी असल्याने आज वाढदिवसादिनी महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभीष्टचिंतनाचा वर्षाव झाला.

Check Also

पालेखुर्द येथील जि.प. शाळेच्या नूतन इमारतीचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राची मराठी संस्कृती अत्यंत समृद्ध आणि महान असून ती जपणे तसेच पुढील …

Leave a Reply