Breaking News

विश्वचषक संघातून पाकने मोहम्मद आमिरला वगळले

कराची : वृत्तसंस्था

इंग्लंडमध्ये होणार्‍या विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानने आपला प्रमुख गोलंदाज मोहम्मद आमिरला विश्वचषक संघात स्थान दिलेले नाही. याव्यतिरिक्त शान मसूदच्या जागी आबीद अलीला संघात स्थान दिले आहे.

यष्टीरक्षक फलंदाज सरफराज अहमद संघाचे नेतृत्व करणार असून, शोएब मलिक, मोहम्मद हाफीज हे खेळाडूही सरफराजच्या दिमतीला असणार आहेत.

असा आहे संघ : सरफराज अहमद (यष्टीरक्षक आणि कर्णधार), आबीद अली, बाबर आझम, फईम अश्रफ, फखार झमान, हारिस सोहेल, हसन अली, इमाद वासिम, इमाम उल-हक, जुनैद खान, मोहम्मद हाफीज, मोहम्मद हुसैन, शोएब खान, शाहीन शहा अफ्रिदी, शोएब मलिक.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply