Breaking News

उरणमध्येही फणस खरेदीसाठी गर्दी

उरण : वार्ताहर

वटपौर्णिमा मंगळवारी (दि. 14) असल्याने दरवर्षीप्रमाणे फणसाला मागणी वाढली आहे. उरण शहरात ठिक-ठिकाणी मोक्याच्या जागी फणस विकावयास आले असून फणस खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला  मिळत आहे.

दरवर्षी पावसाळ्याच्या काही दिवस अगोदर बाजारात फणसाची मोठ्या प्रमाणात आवक होते. काही ठिकाणी किलोनुसार, 40 रुपये किलो तर गरे 200 रुपये किलो अश्या दराने विक्री केई जात होती. तर काही ठिकाणी आकारानुसार विक्री होत आहे. मात्र या फणसाला इतर दिवसांपेक्षा वटपौर्णिमेला मागणी वाढत असल्याने उरण बाजारात रॉयल हॉटेल समोर, पालवी हॉस्पिटल जवळ फणस विकावयास आले होते.

फणस पिकण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत असल्यामुळे फणस विकत घेऊन घरी नेण्याला ग्राहक पसंती देत असल्याची माहिती दिनेश ठाकूर या विक्रेत्याने दिली. तर मोठा फणस खरेदी करण्यापेक्षा रसाळ गरे खरेदीलादेखील ग्राहक पसंती देत आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार अनेक विक्रेते फणसातील गरे काढून त्याची विक्री करत आहेत.

आम्ही कर्नाटक येथून फणस आणतो त्यामुळे फणस हे कापा असतात. गेली 25 वर्षांपासून आम्ही फणस विकत आहोत. 40 रुपये किलो या दराने आम्ही फणस विकतो.

-दिनेश ठाकूर  विक्रेता

कापा किंवा बरका फणस समजून येत नाही. त्यामुळे आम्ही गरे विकत घेणे पसंत करतो विक्रेता कापा सांगतात व विक्री करतात. वट पौर्णिमेला फणसाच्या गरे ना फारचं महत्त्व असते

-संगिता पवार, ग्राहक

यंदा फणसाची रेलचेल कमी किमतीमुळे खवय्ये खुश

सुधागड : रामप्रहर वृत्त

यंदा फणसाचे उत्पादन भरघोस आले आहे. शिवाय कोरोनाचे सावट सरल्याने व कोरोनाचे निर्बंध नसल्याने  जिल्ह्यात फणसाच्या किंमती निम्म्याने उतरल्या आहेत. गेल्या वर्षी 150 रुपये किलोने मिळणारे फणस आता अवघे 100 ते 110 रुपये किलोने मिळत आहेत. परिणामी खवय्ये खुश आहेत.

वटपौर्णिमा एक दिवसांवर आली आहे. वटपौर्णिमेला फणसाला सर्वात जास्त मागणी असते. यंदा फणस स्वस्त मिळत असल्याने सुहासिनी महिला देखील आनंदी आहेत. असे पालीतील लता माळी या गृहिणीने सांगितले. तर शरद निकुंभ म्हणाले की बाजारात मोठ्या प्रमाणात फणस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे फणस खरेदीसाठी रेलचेल दिसत आहे. रायगड जिल्ह्यासह जिल्ह्यातील व शेजारील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फणस देखील येथे विक्रीला आले आहेत.

मागील वर्षी लॉकडाऊन होते. बाजारात काही प्रमाणात निर्बंध देखील होते. परिणामी फणसाची आवक कमी होती. मागणी सुध्दा फार नव्हती त्यामुळे फणस महाग होते. मात्र यंदा आवक व मागणी अधिक आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध हटविले असून फणसाचे उत्पादन देखील चांगले झाले असल्याने फणसाच्या किंमती उतरल्या आहेत.

-सुभाष ओसवाल, व्यापारी, पाली

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply