Breaking News

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांचा अनुभव घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर

उरण : रामप्रहर वृत्त
कर्मवीर अण्णांनी दिलेला शिक्षण आणि संस्कारांचा आदर्श आपल्याला पुढे घेऊन जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेतील गुणांवर अवलंबून न राहता इतर सर्व क्षेत्रांतही विविध अनुभव घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जासई (ता. उरण) येथे केले.
संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९वी जयंती बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते.
या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डी.बी. पाटील, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, चेअरमन अरुण जगे, व्हाईस चेअरमन डी.आर. ठाकूर, नुरा शेख, डी.बी. म्हात्रे, अमृत ठाकूर, रघुनाथ ठाकूर, गोपीनाथ ठाकूर, वीणा घरत, जयश्री घरत, मधुकर पाटील, प्रा.एस.बी. गाताडी, डी.आर. वर्तक, पर्यवेक्षिका के.एस. मुकादम यांच्यासह पालक-शिक्षक संघ आणि माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी, ग्रामस्थ, उपस्थित होते. यावेळी निवृत्त शिक्षक सागर रंधवे यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. के. कुटे यांनी प्रास्ताविक सादर केले. कार्यक्रमादरम्यान ज्युनियर कॉलेजच्या स्कूल कमिटीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल संतोष घरत, विनायक घरत आणि गोपीनाथ म्हात्रे यांचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यालयातील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला

Check Also

सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे मंगळवारी पनवेलमध्ये पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तसामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारे श्री. …

Leave a Reply