पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणप्रकरणी काँग्रेसविरोधात सोमवारी (दि.१२) भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा उत्तर रायगडच्या वतीने पनवेलमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस खासदार डॉ. विमोल अकोइजम यांच्यावरील विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप आणि त्या संदर्भातील कारवाईचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
भाजपच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालय येथे जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस पक्षाचा निषेध नोंदवण्यात आला तसेच काँग्रेस खासदार डॉ. विमोल अकोइजम यांच्यावर कारवाईची मागणी करत या गंभीर प्रकरणावर काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व मौन का बाळगून आहे, असा संतप्त सवाल महिला मोर्चाकडून विचारण्यात आला.
या आंदोलनामध्ये भाजपच्या जिल्हा सरचिटणीस व माजी उपमहापौर चारुशीला घरत, महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम, पनवेल महापालिकेच्या उपमहापौर प्रमिला पाटील, भाजप महिला मोर्चा पनवेल शहरध्यक्ष तथा नगरसेविका रूचिता लोंढे, नगरसेविका दर्शना भोईर, दमयंती भोईर, प्रियांका कांडपिळे, सरस्वती काथारा, राजश्री वावेकर, प्रीती जॉर्ज, श्वेता बहिरा, शिवानी घरत, माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, सारिका भगत, दीक्षा जाधव, राणी म्हात्रे, शिल्पा म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Check Also
पाली येथे भाजपची सेवा ज्योती यात्रा
पाली ः प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेतील ऐतिहासिक प्रवासाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने …
RamPrahar – The Panvel Daily Paper