Breaking News

स्वर मुझिक रेकॉर्डिंग स्टुडीओचा गुण गौरव सोहळा

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील सोनारी गावाचे साईभक्त, तसेच संगीत क्षेत्रात खूप आवड असलेले भजनीबुवा म्हणून प्रसिद्ध असलेले स्व. वामन दत्तात्रेय कडू यांचा सुपुत्र स्वर म्युझिक रेकॉर्डिंगचे मालक स्वप्नील वामन कडू याने आज संगीत क्षेत्रात उंच भरारी घेतली असून उरण तालुक्याचे नाव उंच शिखरावर नेले आहे. त्यानिमित्ताने सोनारी येथे रविवारी (दि. 2) गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात जय मातादी ग्रुपचे तथा सोनारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महेश कडू यांनी स्वर म्युझिक रेकॉर्डिंग यांना बक्षीस म्हणून 50 हजार रुपये दिले. या वेळी सोनारी ग्रामपंचायत सरपंच पूनम महेश कडू, सदस्या मेश्राम कडू, जगदीश म्हात्रे, जितेश कडू, रेश्मा नंदकुमार कडू, सोनारी गाव माजी अध्यक्ष नारायण तांडेल, जगदीश कडू, हितेश कडू व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply