Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते योग ग्राऊंडचे भूमिपूजन

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त

पतंजली योगपीठ ट्रस्ट, हरिद्वार यांच्याद्वारे खांदेश्वर स्टेशनसमोरील मैदानावर योग ग्राऊंडच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (दि. 9) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा झाला.यावेळी पंतजली योग ट्रस्ट कामोठेचे अध्यक्ष आर. पी. यादव यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. भूमिपूजन कार्यक्रमाला नगरसेवक दिलीप पाटील, गोपीनाथ भगत, विजय चिपळेकर, कुसुम म्हात्रे, भाजप युवा कार्यकर्ते भाऊ भगत, राजेश म्हात्रे, अनिल केंद्रे, सुजीत पुजारी, शरद जगताप, सचिन गायकवाड आदी उपस्थित होते. या सर्वांचा सत्कार पतंजली योगा टीमने केला.

Check Also

अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन्‌‍ बोलके राहा!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …

Leave a Reply