तक्का येथे पाइपलाइन फोडून पाण्याची चोरी

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महापालिका हद्दीत दोन-दोन दिवस पाणी मिळत नाही. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो, मात्र अशी भीषण पाणीटंचाई असतानाही तक्का हद्दीत पाइपलाइन फोडून पाण्याची चोरी करण्यात येत आहे. रिक्षातून नेऊन चोरीचे पाणी विकण्याचा धंदा जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे.

पनवेल महापालिका हद्दीत तक्का येथे रेल्वेच्या भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. त्याला जोडणार्‍या रस्त्याच्या बाजूने नदीच्या काठावरून पाण्याची पाइपलाइन गेली आहे. या पाइपलाइनला भोक पाडून त्याला प्लास्टिकचा पाइप जोडून पाण्याची चोरी करण्यात येत आहे. त्या ठिकाणाहून पाण्याचे कॅन भरून रिक्षातून नेले जातात. हे पाणी रस्त्यावरील खाद्यपदार्थांची विक्री करणार्‍यांना विकले जात असल्याचे समजते. अनेक महिने बिनबोभाटपणे हा पाण्याचा व्यवसाय सुरू आहे. यामुळे रोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे, पण त्याकडे संबंधित विभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. सेक्टर 15मधून गेलेल्या जीवन प्राधिकरणाच्या पाइपलाइनलाही भोके पाडून त्यामधून रेल्वेच्या ठेकेदाराची माणसे पाणी चोरत असल्याचे सांगितल्यावर जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी आम्ही किती ठिगळे लावायची, असे उत्तर दिले होते. त्यामुळे यामध्ये अधिकारी आणि कर्मचारीवर्गही सामील असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply