Breaking News

दाऊदची गावाकडील मालमत्ता होणार जप्त; मूल्यांकन सुरू

रत्नागिरी : प्रतिनिधी

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील विविध मालमत्तांचा लिलाव यशस्वी झालेला असताना उच्च न्यायालयाने आता त्याच्या मूळगावी मोर्चा वळविला आहे. खेड तालुक्यातील मुंबके येथील त्याच्या वडीलोपार्जित मालमत्तेचे मूल्यांकन सुरू झाले आहे.

दाऊदने 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर परदेशात पलायन केले होते. सध्या तो पाकिस्तानात असल्याचा दावा भारतीय गुप्तहेर यंत्रणांनी केला आहे. मुंबईतही त्याच्याविरोधात कारवाई सुरु असून दाऊदच्या विविध मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दाऊदचे रत्नागिरीतील मूळ गाव मुंबके येथे पोलिसांसह महसूल विभागाचे पथक पोहोचले असून त्याच्या संपत्तीचे मोजमाप सुरु करण्यात आले आहे. लवकरच ही संपत्ती जप्त करण्यात येणार आहे. मुंबके येथे तीन मजली इमारत, पेट्रोल पंपासाठीची जागा तसेच बाग अशी मालमत्ता मुंबके येथे आहे. ही मालमत्ता दाऊदची बहीण हसिना पारकर तसेच दाऊदच्या आईच्या नावावर आहे.

मुंबईतील अमिना मेन्शन या शेवटच्या इमारतीचा गेल्यावर्षी लिलाव करण्यात आला होता. या लिलावात 3.51 कोटी रुपये प्राप्त झाले होते. दाऊद इब्राहिम 1993 मधल्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आहे. या दहशतवादी हल्ल्यात 257 मुंबईकरांना स्वतःच्या प्राणांना मुकावे लागले होते. तसेच अनेक जण जखमीही झाले होते. या हल्ल्यानंतर दाऊद इब्राहिम देश सोडून पळाला. 2012मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी करताना अमिना कासकर आणि हसिना पारकर यांना मालमत्तेचे दस्तावेज दाखवण्याससांगितले होते.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply