Breaking News

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फत रोडपाली परिसराची स्वच्छता

पनवेल ः प्रतिनिधी

रोडपाली सेक्टर 20 येथील रिक्रिएशन ग्राऊंडमध्ये कचर्‍याचा ढीग पडला होता. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. त्याअनुषंगाने रोडपाली रेसिडेन्सी सेल्फवेअर असोसिएशनचे चेअरमन गिरीश जोशी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पनवेल महापालिका आणि सिडकोमध्ये तक्रार केली होती. त्यावर सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुढाकार घेऊन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळामार्फत हा परिसर स्वच्छ करून दिला.

या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, नगरसेवक अमर पाटील, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्यासह रोडपाली रेसिडेन्सी सेल्फवेअर असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. या वेळी सेल्फवेअर असोसिएशनचे चेअरमन गिरीश जोशी यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली.

Check Also

वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!

वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …

Leave a Reply