बर्मिंगहॅम ः वृत्तसंस्था
इंग्लंडच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजीला चांगलेच झोडपले. इंग्लंडचे सलामीवीर आणि बेन स्टोक्सच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडच्या फलंदाजांनी फटकेबाजी करीत भारतापुढे 338 धावांचे आव्हान ठेवले. भारतीय संघाकडून मोहम्मद शमीने पाच गडी बाद केले, पण शमीच्या 10 षटकात इंग्लंडने 69 धावा वसूल केल्या.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉय आणि जॉनी बेअरस्टोव यांनी भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत दोघांनी अर्धशतके झळकावली. या दोघांनी 160 धावांची सलामी दिली. यानंतर रॉयने कुलदीप यादवच्या चेंडूवर मोठा फटका लगावला. हा चेंडू आता चौकार जाणार असे वाटत होते, पण मैदानात आलेल्या बारावा खेळाडू रवींद्र जडेजा सूर लगावत झेल टिपला आणि भारताला पहिले यश मिळाले.
रॉय बाद झाल्यावरही जॉनी दमदार फटकेबाजी करीत होता. बेअरस्टोव हा भारतीय गोलंदाजीची पिसे काढत होता. जॉनीला बाद कसे करायचे, हा पेच कोहलीपुढे होते. त्यावेळी कोहलीने शमीला गोलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी शमीने कोहलीचा विश्वास सार्थ ठरवला. शमीने या वेळी फक्त जॉनीलाच बाद केले नाही तर इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनलाही स्वस्तात तंबूत धाडले. जॉनीने यावेळी 10 चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 111 धावांची खेळी साकारली.
भारताला जेसन रॉयच्या रुपात पहिले यश मिळाले. रॉय आणि जॉनी बेअरस्टोव यांनी भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत दोघांनी अर्धशतके झळकावली. या दोघांनी 160 धावांची सलामी दिली. यानंतर रॉयने कुलदीप यादवच्या चेंडूवर मोठा फटका लगावला. हा चेंडू आता चौकार जाणार असे वाटत होते. पण मैदानात आलेल्या बाराव्या खेळाडूने सूर लगावत झेल टिपला आणि भारताला पहिले यश मिळाले.
हा झेल टिपला तो बारावा खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या रवींद्र जडेजाने. कारण क्षेत्ररक्षण करताना लोकेश राहुलला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे बारावा खेळाडू म्हणून जडेजा मैदानात आला होता. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने भेदक मारा केला. नाही तर इंग्लंडचा संघ चारशे धावांच्या जवळपास जाऊ शकला असता.