पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्य शासनाच्या वन विभागातर्फे 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या मोहिमेंतर्गत पनवेल महापालिकेच्या वतीने मनपा क्षेत्रात 15 हजार रोपांची लागवड करण्यात येणार असून, त्याचा शुभारंभ सोमवारी (दि. 1) पिसार्वे येथे महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाडे लावून करण्यात आला.
पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी शासनाच्या वन विभागाने राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. पनवेल महापालिकेकडूनही आपल्या क्षेत्रात 15 हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या शुभारंभास स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे, महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, नगरसेविका मुग्धा लोंढे, उपायुक्त संध्या बावनकुळे, तेजस्विनी गलांडे, प्रभाकर जोशी आदी उपस्थित होते.