Breaking News

‘मिशन ऑलिम्पिक गोल्ड 2024’चा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि दिपांकर्स बॅडमिंटन अ‍ॅकॅडमी यांच्या वतीने आयोजित मिशन ऑलिम्पिक गोल्ड 2024 या अभियानाचा शुभारंभ रविवारी (दि. 30) करण्यात आला. हा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, इंटरनॅशनल मास्टर एनएलपी प्रॅक्टिशनर म्रिनाल चक्रवर्ती, इंटरनॅशनल स्पोर्टस्चे शरीरविज्ञानशास्त्रज्ञ डॉ. निखिल लाटे, स्पोर्ट्स फिजिओथेरपीस्ट डॉ. दर्णे, इंटरनॅशनल रिकॉगनाइझ मलेशियन प्रशिक्षक मोहद हैरी मॅट बिन झुबेर, नेरूळच्या पोतदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सोमा चटर्जी आदी उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply