उलवे नोड : रसायनी परिसरातील तुराडे येथील काँग्रेसचे कार्यकर्ते प्रमोद केणे यांनी त्यांच्या समर्थकांसह रविवारी (दि. 14) भाजपमध्ये प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले.उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या कार्यक्रमास भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष व पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा यांच्यासह सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी माळी, माजी सरपंच संतोष माळी, डॉ. अविनाश गाताडे, गुळसुंदे जि. प. अध्यक्ष प्रवीण खंडागळे, पं. स. विभागीय अध्यक्ष सुनील माळी, सीताराम माळी, तुराडे येथील माजी सरपंच गोविंद भोईर, युवा नेते निकेत ठाकूर, स्वप्नील ठाकूर, वामन गायकर, नीलेश केणी, राजेश केणी, मनीष केणी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
संत रोहिदास महाराज जयंती भाजपतर्फे विविध कार्यक्रमांनी होणार साजरी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त …
RamPrahar – The Panvel Daily Paper