Breaking News

नेरळ पोलिसांकडून गावठी दारूभट्या उद्ध्वस्त

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील बेकरे गावाच्या जंगलात असलेल्या गावठी दारु तयार करण्याच्या दोन हातभट्ट्या नेरळ पोलिसांनी उध्वस्त केल्या आहेत.

बेकरे परिसरात गावठी दारुच्या हातभट्ट्या सुरु असल्याची माहिती शनिवारी (दि. 23) नेरळ पोलिसांना मिळाली, त्यानुसार  पोलीस उपनिरीक्षक रतीलाल तडवी, पोलीस नाईक निलेश वाणी, होमगार्ड राहुल पाटील, सातपुते यांच्या पथकाने बेकरे गावातील जंगलात जाऊन पाहणी केली असता, ओहोळा किनारी हातभट्टी दारू बनविण्याचे समान त्यांना आढळून आले. या वेळी दोन भट्या, हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारा काळा गूळ, नवसागर मिश्रित रसायनाने भरलेले दोनशे लिटर क्षमतेच्या टाक्या पोलिसांना मिळून आल्या. त्यात सुमारे 2700 लिटर रसायन होते. या सगळ्या मालाची अंदाजे किंमत 91 हजार रुपयांच्या आसपास होते. मात्र जागेवर कुणी मिळून आले नाही. त्यामुळे त्या वस्तूंचा पंचनामा करून पोलिसांनी ती हातभट्टी दारू उध्वस्त करून टाकली.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply