
रेवदंडा : प्रतिनिधी
साळाव येथील बिर्ला मंदिरनजीक मुख्यः रस्तालगत उभ्या असलेल्या कारने दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतला. जेएसडब्ल्यू कंपनीच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.
जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी विनय थत्ते हे स्वतःच्या कारने अलिबागहून साळाव बिर्ला मंदिर येथे आले व त्यांनी बिर्ला मंदिरनजीक मुख्य रस्त्यावर कार उभी ठेवून ते खरेदीसाठी बाहेर आले. काही वेळाने या कारने अचानक पेट घेेतला. आगीचे वृत्त कळताच जेएसडब्ल्यू कंपनीच्या अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी त्वरेने येऊन आग आटोक्यात आणली. या आगीचे कारण समजू शकले नाही. रेवदंडा पोलीस ठाण्यात विनय थत्ते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकस्मात आग म्हणून या घटनेची नोंद झाली आहे. आगीत कारचे एक लाख 10 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे थत्ते यांनी सांगितले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper