नागोठणे : प्रतिनिधी – सहकार खात्याच्या रोहे येथील दुय्यम निबंधकांच्या आदेशानुसार नागोठणे येथील अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने केएमजी विभागात वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. जि. प. सदस्य नरेंद्र जैन, संस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर, भाई टके, ग्रा. पं. सदस्य अतुल काळे, अखलाक पानसरे, प्रियदर्शनी वाहतूक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब टके, किशोर म्हात्रे यांच्या हस्ते गवळआळीतील राधाकृष्ण मंदिर परिसरात वृक्षारोपण करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी संस्थेचे जयराम पवार, महादेवसिंग परदेशी, नामदेव चितळकर, दिलीप सोनवणे, रतन हेंडे, आरती हातलोणकर, अशोक भंडारे, सखाराम ताडकर, नामदेव नाईक, दिनेश घाग, नारायण चौलकर, असिफ अधिकारी, पांडुरंग चौलकर, नामदेव लाड, सुभाष घाग, खांडेकर गुरुजी, मधुकर चौलकर, सुदाम घाग, प्रसाद जोगत, संजय सांगळे, नारायण म्हात्रे, अनिल नागोठणेकर, जगदीश चौलकर, प्रभाकर धुमाळ, उल्हास शिंदे, भाऊ मोरे, नाना पवार आदींसह केएमजी विभागातील नागरिक उपस्थित होते.
केएमजी विभागाच्या दोन स्मशानभूमी आहेत. या दोन्ही ठिकाणी 51 झाडे लावण्यात येणार आहेत. सर्व झाडे जगविण्यासाठी येथील नागरिक त्यांची देखभाल करणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर यांनी या वेळी दिली.
RamPrahar – The Panvel Daily Paper