Breaking News

डॉ. धर्माधिकारी महाविद्यालयात युवा माहितीदूत कार्यक्रम

रोहा ः प्रतिनिधी

कोलाड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात सोमवारी

(दि. 22) युवा माहितीदूत हे अ‍ॅप डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. युवा माहितीदूत अ‍ॅपमध्ये राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आहे. युवकांना माहितीदूत म्हणून काम करण्यासाठी हे अ‍ॅप महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन  प्रमुख मार्गदर्शक कांतीलाल पाटील यांनी या वेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल सानप यांनी केले. प्राचार्य डॉ. शंकर मुंडे, उपप्राचार्य जगदिश पाठक, अमोल तळकर, प्रा. सूर्यकांत आमलपुरे, प्रा. नेहल प्रधान, प्रा. रेश्मा शेळके, प्रा. सावळे, प्रा. अडलीकर यांसह विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख अनिरुद्ध मोरे यांनी आभार मानले.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply