Breaking News

भाजप केंद्रीय सहसंघटक मंत्री व्ही. सतीश यांचे मार्गदर्शन

पेण : प्रतिनिधी

रायगड लोकसभा मतदारसंघामधील चार विधानसभा क्षेत्रातील भाजपच्या शक्ती केंद्र प्रमुखांसाठी रविवारी (दि. 28) दुपारी 1.30 वाजता पेण येथील आगरी समाज हॉलमध्ये मार्गदर्शन शिबिर होणार आहे. या शिबिरात भाजपचे केंद्रीय सहसंघटक मंत्री व्ही सतीश हे शक्ती केंद्र प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. भाजपचे कोकण संघटन मंत्री सतीश धोंड, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा प्रभारी आमदार प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवीशेठ पाटील, भाजप पेण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष विष्णू पाटील, अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष कृष्णा कोबनात आदी मान्यवर या शिबिराला उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील यांनी दिली.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply