Breaking News

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज माणगावमध्ये

माणगाव : प्रतिनिधी

महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी बुधवारी (दि. 17) शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे माणगाव येथे येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत महायुतीची जाहीर सभा सायंकाळी 5 वा. बामणोली रोड येथील टिकमभाई मेथा कॉलेजच्या भव्य मैदानात होणार असल्याची माहिती रायगड जिल्हा शिवसेनाप्रमुख रवी मुंढे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

या सभेला केंद्रीय मंत्री व महायुतीचे उमेदवार अनंत गीते, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार भरत गोगावले, आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार तुकाराम सुर्वे यांची उपस्थिती लाभणार आहे. त्याचप्रमाणे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सदानंद थरवळ, जिल्हाप्रमुख किशोर जैन, भाजप जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, रिपाइं कोकण अध्यक्ष नगरसेवक जगदीश गायकवाड, भाजप तालुकाध्यक्ष संजयअप्पा ढवळे आदी उपस्थित राहणार आहेत.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply