आशिष कुमारला सुवर्ण; भारताची आठ पदकांची कमाई

बँकॉक ः वृत्तसंस्था

आशियाई अजिंक्यपद रौप्यपदक विजेत्या आशिष कुमारने शनिवारी (दि. 27) पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे बँकॉक येथे झालेल्या थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग

स्पर्धेत भारताने आठ पदकांची कमाई केली.

जगातील 37 देशांच्या बॉक्सिंगपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारताने वर्चस्वपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करताना एक सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यपदकांची कमाई केली. अखेरच्या दिवशी माजी कनिष्ठ विश्वविजेती निखात झरीन (51 किलो), आशियाई अजिंक्यपद रौप्यपदक विजेता दीपक (49 किलो), गीबी बॉक्सिंग स्पर्धेतील रौप्यपदक विजेता मोहम्मद हसमुद्दीन (56 किलो) आणि इंडिया खुल्या स्पर्धेंतील रौप्यपदक विजेता ब्रिजेश यादव (81 किलो) यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

75 किलो वजनी गटात आशिषने कोरियाच्या किम जिनजाईचा 5-0 असा पराभव केला. इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक जिंकणार्‍या आशिषने दोन महिन्यांत आणखी एका पदकाची कमाई केली.

स्ट्रँडजा चषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्‍या निखातचा आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या चँग युआनपुढे निभाव लागला नाही. चँगने निखातला 5-0 अशी धूळ चारली. 56 किलो गटात थायलंडच्या चाटचाय डेशा बुटडीने हसमुद्दीनचा 5-0 असा पराभव केला. 49 किलो गटात दीपकने उझबेकिस्तानच्या मिर्झाखमेदोव्ह नॉदिजॉनला नमवले. 81 किलो गटात थायलंडच्या अनावट थाँगक्रॅटॉव्हने ब्रिजेश यादवचा 4-1 असा पाडाव केला.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply