Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात कार्यशाळा

खारघर ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि. 24) स्पर्धा परिक्षा कक्षातर्फे आयपीएस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्रा. महेश धायगुडे, प्रा.प्रथमेश ठाकूर, प्रा. नम्रता परिक व प्रा. अंकिता जांगीड हे उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रमुख उद्दिष्ट बँकिंग क्षेत्रामध्ये असणार्‍या वेगवेगळ्या संधी व बँकिंग परीक्षेचे नियोजन कसे करावे याचे मार्गदर्शन हे होते.

प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यशाळेचे आयोजन प्र्रा. महेश धायगुडे यांनी केले. प्रा. नम्रता परिक, प्रा. भागयश्री शुक्ला, प्रा. रूपाली नागरेकर यांनी सहकार्य केले.

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरूणशेठ भगत, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख व संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष

रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply