Breaking News

आरोग्य महाशिबिराची आज नियोजन बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सिडकोचे अध्यक्ष, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन आणि भाजप पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महाशिबिराच्या

नियोजनासंदर्भातील आढावा बैठक शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी 5 वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीस सर्व समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी केले आहे. दरम्यान, आरोग्य महाशिबिराची जोरदार तयारी सुरू असून मंडप उभारणीचे काम वेगाने चालू आहे.

Check Also

निसर्गाच्या सानिध्यात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, …

Leave a Reply