पनवेल : गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक अरुण घाग आणि उपशिक्षक प्रमोद कोळी यांची रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्करपदी निवड झाली आहे. त्याबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दोघांचे सोमवारी अभिनंदन केले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख संजीवनी म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सदस्य कामिनी कोळी, मोतीराम कोळी, रवींद्र भोईर आदी उपस्थित होते.
Check Also
अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या
आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची विधिमंडळात मागणी मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील अवकाळी पाऊस, …
RamPrahar – The Panvel Daily Paper