मुंबई : प्रतिनिधी
महावितरण कंपनीच्या कर्मचार्यांनी विविध मुद्द्यांवर तीन दिवसांचा संप पुकारला होता. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी बुधवार (दि. 4)पासून बत्ती गूल झाली होती. राज्यातील जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्याला यश आले असून वीज कर्मचार्यांनी आपला संप मागे घेतला आहे.
या संदर्भात महावितरण कंपनीच्या 32 संघटनांचे प्रतिनिधी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बुधवारी दुपारी बैठक झाली. याबद्दल पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महावितरणचे खासगीकरण करायचा कोणताही विचार नाही. उलट वीज कंपन्यांमध्ये 50 हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल. त्याचप्रमाणे इतर समस्याही सोडविल्या जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. त्यानंतर महावितरण कंपनीच्या वतीने संप मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
Check Also
राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर; रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडे
मुंबई : रामप्रहर वृत्तराज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी शनिवारी (दि. 18) जाहीर करण्यात आली. गडचिरोलीचे पालकमंत्रीपद …