Breaking News

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचा रौप्य महोत्सव; पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची आज प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त

शिक्षणासह विविध क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त बुधवारी (दि. 14) सायंकाळी 4 वाजता दुसरा विशेष समारंभ होणार आहे. या समारंभास रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विभागाचे सहाय्यक शिक्षण संचालक भास्करराव बाबर, शिक्षण आयुक्त कार्यालय सहसंचालक राजेंद्र गोधणे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त दत्तामय जगताप यांची, तर विशेष अतिथी म्हणून सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, उपमहापौर विक्रांत पाटील, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, संतोष शेट्टी, मनोहर म्हात्रे, प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, समीर ठाकूर, नगरसेविका चारुशीला घरत, सुशीला घरत, वृषाली वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

विविध स्पर्धांतील विजेत्यांना या वेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या समारंभास विद्यार्थी, पालक व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, सहसचिव डॉ. नंदकुमार जाधव, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बर्‍हाटे यांनी केले आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply