Breaking News

भाजप नेते महेश बालदी यांच्याकडून दिघाटी पूरबाधितांना आर्थिक मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्त 

पुराचे पाणी घरात शिरून नुकसान झालेल्या दिघाटी येथील ग्रामस्थांना जेएनपीटीचे विश्वस्त तथा भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी आर्थिक मदत केली आहे. 65 पूरबाधित कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात आले.

मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील दिघाटी गावात पूरस्थिती निर्माण होऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. या पार्श्वभूमीवर भाजप नेते महेश बालदी यांनी स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत नुकसानीचा आढावा घेतला आणि सामाजिक बांधिलकीतून पूरबाधित कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.

दिघाटी ग्रामस्थांना मदत देतेवेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष अ‍ॅड. संजय टेंबे, कसळखंड ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच अनिल पाटील, दिघाटीचे सरपंच अमित पाटील, माजी उपसरपंच दत्तात्रेय पाटील, केळवणे पंचायत समिती गण अध्यक्ष हिरामण ठाकूर, ज्येष्ठ नेते चांगाजी पाटील, बळीराम ठाकूर, पुंडलिक पाटील, कसळखंडचे ज्येष्ठ नेते यशवंत पाटील, दत्ता गायकवाड, दिघाटी

ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील, ग्रामपंचायत सदस्या वैशाली पाटील, स्मिता ठाकूर, हर्षदा पाटील, भाजप बुथ कमिटी सदस्य सुबोध ठाकूर, कार्यकर्ता कैलास पाटील, विकास पाटील, प्रवीण पाटील, राजेश ठाकूर, संदीप पाटील,

मच्छींद्र पाटील, राजाराम पाटील, रामदास ठाकूर, अर्जुन ठाकूर, सखाराम पाटील, राकेश पाटील, नरेश पाटील, सुजीत पाटील, हनुमंत पाटील, हरिश्चंद्र ठाकूर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व

ग्रामस्थ उपस्थित होते. मदतीबद्दल ग्रामस्थांनी भाजप नेते महेश बालदी यांचे आभार मानले.

Check Also

स्व. भागुबाई चांगू ठाकूर यांच्या १३व्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मातोश्री स्व. …

Leave a Reply