Breaking News

सुकापूर येथील 51 इमारती धोकादायक

पनवेल : बातमीदार

सुकापूर (पाली देवद) येथील 51 इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. या इमारती खाली करण्यासाठी रहिवाशांना ग्रामपंचायतीने नोटीस बजावल्या आहेत.

नवीन पनवेललाच लागून सुकापूर गाव असल्याने येथे लोकवस्ती वाढू लागली आहे. मोठ-मोठे बांधकाम व्यावसायिक सुकापूर परिसरात आल्याने नागरीकीकरण प्रचंड वाढले आहे. 35 ते 40 वर्षांपूर्वी बांधलेल्या काही इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. काही इमारती तर केव्हाही कोसळू शकतात अशी परिस्थिती आहे. काही जण जीव मुठीत धरून धोकादायक इमारतीत वास्तव्य करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा इमारतींना ग्रामपंचायतीने नोटीस बजावून इमारती खाली करण्यास सांगितले आहे.

नैनाला आमचा विरोध नाही. येथील इमारती नादुरुस्त झालेल्या आहेत. नैनाने रिडेव्हलपमेंटचा विचार करावा.

-अमित जाधव, जि. प. सदस्य

Check Also

संत रोहिदास महाराज जयंती भाजपतर्फे विविध कार्यक्रमांनी होणार साजरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त …

Leave a Reply