Breaking News

भाजपची गव्हाण विभाग नूतन कार्यकारिणी जाहीर

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकट करण्यासाठी गव्हाण जिल्हा परिषद विभाग आणि वहाळ पंचायत समिती उलवे नोड १च्या नवीन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१९) झालेल्या कार्यक्रमात नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीची घोषणा लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. यामध्ये गव्हाण जिल्हा परिषद विभाग उलवे नोडच्या अध्यक्षपदी निलेश खारकर, सरचिटणीपदी संजय नाईक, अखिलेश यादव, रमेश ठाकूर, उपाध्यक्षपदी अभिमन्यू दापोलकर, हरेश्वर म्हात्रे, प्रशांत घरत, दिलीप चव्हाण, चिटणीसपदी रामदास नाईक, भानूदास कडू, मनोज कुमार मौर्या, किरण मढवी, चेतन पाटील, विशाल कोळी, राकेश घरत, कोषाध्यक्षपदी दीपक गोंधळी, राजन घरत यांचा समावेश आहे; तर वहाळ पंचायत समिती उलवे नोड १च्या अध्यक्षपदी वितेश म्हात्रे, सरचिटणीसपदी अंकुश ठाकूर, कुलदीप तिवारी, उपाध्यक्षपदी शैलेश भगत, प्रसाद डोलकर, प्रवीण ठाकूर, रवींद्र शिंदे, चिटणीसपदी गणेश पाटील, विक्रम कोळी, विजय ठाकूर, बळीराम गायकवाड, चिंतामण गोंधळी, देवालय मित्रा, कोषाध्यक्षपदी प्रमोद कडू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उलवे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य निकिता खारकर, पंचायत समिती सदस्य वितेश म्हात्रे, माजी सदस्य रत्नप्रभा घरत, भाजप नेते राकेश गायकवाड, युवा मोर्चा पश्चिम मंडळ अध्यक्ष धीरज ओवळेकर, महिला मोर्चाच्या गव्हाण पंचायत समिती अध्यक्ष योगिता भगत, पनवेल पश्चिम मंडळ उपाध्यक्ष सुहास गोंधळी यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नवनियुक्तांना आगामी वाटचालीसाठी मार्गदर्शन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

Check Also

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना युवाशक्तीला नवी दिशा देणारी

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राबविण्यात …

Leave a Reply