पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या बेघर निवारा प्रकल्पाची शुक्रवारी स्थायी समितीचे सदस्य परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक दशरथ म्हात्रे, नगरसेविका सीताताई पाटील, कुसूम पाटील आदींनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती, सुविधा व बांधकामाच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यात आला.
बेघर निवारा प्रकल्प एकूण ७५ बेड क्षमतेचा आहे. या प्रकल्पात कुटुंबे व ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र मजल्यांवर निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्वयंपाकघर, स्टोअर रूम, स्वच्छतागृहे, स्नानगृहे, लिफ्ट आणि पाणी साठवणुकीसाठी टाक्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
पाहणीदरम्यान स्थायी समिती सदस्य परेश ठाकूर व महापालिका सदस्यांनी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना काम दर्जेदार व नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या तसेच नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व सुसज्ज निवारा उपलब्ध व्हावा यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत मार्गदर्शन केले.
Check Also
अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन् बोलके राहा!
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …
RamPrahar – The Panvel Daily Paper