Breaking News

नागोठण्यात रस्त्याला भगदाड; अपघाताची भीती

Exif_JPEG_420

नागोठणे : प्रतिनिधी

येथील नवीन पुलानजीक नागोठणे-पोयनाड मार्गावर उत्तर बाजूच्या रस्त्यावर भलेमोठे भगदाड पडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने ते बुजवावे, अशी मागणी केली जात आहे. नागोठण्याकडे येताना या रस्त्याला उतार असल्याने येणारी गाडी वेगाने खाली उतरत असते. त्याच्या बाजूला मोठी दरी असल्याने चालकाचे वाहनावर नियंत्रण न राहिल्यास या भगदाडामध्ये चाक अडकून वाहन पलटी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नसल्याने संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

Check Also

अष्टपैलू गायिका आशा भोसले

आशा भोसले… सुरुवात कुठून करावी असा या व्यक्तिमत्वाची खोलवर ओळख करून देताना मला प्रश्न पडतोय …

Leave a Reply