Breaking News

कर्जत भाजपतर्फे आंबोट येथे मोफत आरोग्य शिबिर

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

भारतीय जनता पक्ष कर्जत मंडळ आणि तेरणा मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील आंबोट येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. भाजप किसान मोर्चाचे कोकण विभाग संघटक सुनील गोगटे  यांच्या विशेष प्रयत्नाने घेण्यात आलेल्या या शिबिराचा लाभ पोटल, पाली, आंबोट येथील 152 ग्रामस्थांनी घेतला. या आरोग्य शिबिरात तज्ज्ञांकडून विविध तपासण्या करण्यात आल्या. त्यातील सुमारे बावीस लोकांना  विविध उपचार करण्यासाठी नवी मुंबईतील तेरणा हॉस्पिटल नेण्यात येणार आहे. तेथे त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. भाजपचे सुनील गोगटे, मिनेश मसणे, स्नेहा गोगटे, वैभव मसणे, नरेश  मसणे, संदीप मसणे, पंकज मसणे, नवनीत मसणे, प्रथमेश मसणे, समाधान मसणे, मनोहर मुकणे, प्रफुल मसणे, रवींद्र कोळंबे, प्रकाश मसणे, सचिन मसणे राहुल मसणे, सर्वेश गोगटे यांच्यासह ग्रामस्थ रामदास मसणे, दत्ता मसणे, सदाशिव मसणे, सरदार मसणे, सुरेश वालकू मसणे, भगवान मसणे, मनोहर मसणे शांताराम मसणे, प्रल्हाद शंकर मसणे, रामभाऊ मसणे, अनंता सोनावले, सागर मसणे या शिबिराला उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply